वेळापूरच्या सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील विद्यालयात विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा


:वेळापूर येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील विद्यालयात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
      शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी गीतांजली माने-देशमुख हिच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम सर्व शिक्षकांनी प्रतिमा पूजन केले.यावेळी व्यासपीठावरती विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
         विद्यालयातील मुलींनी आदर्श स्त्रियांचा परिचय करून देताना राजमाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले, झाशीची राणी,अहिल्याबाई होळकर, लता मंगेशकर,किरण बेदी, डॉक्टर, शिक्षिका,वकील,पायलट, शेतकरी,भारत माता अशा अनेक वेशभूषेतून  विद्यार्थ्यांना संदेश दिले.
         यावेळी विद्यालयातील जेष्ठ शिक्षिका प्रभावती कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील क्रांती मोहिते,प्रभावती कुलकर्णी,छाया चव्हाण,प्राजक्ता धर्माधिकारी, कोमल साठे,तृप्ती मार्डीकर व भाग्यश्री दरेकर यांनी परिश्रम घेतले.

No comments