माळशिरस । सासरच्या जाचाला कंटाळून विवाहतेची आत्महत्या
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहतेनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना माळशिरस येथे घडली असून या घटनेने तालुक्यातील खळबळ उडाली आहे.
याबाबत विवाहितेचे वडील नवनाथ तुऴशिराम वगरे यांनी फिर्याद दिली असून त्यांचे फिर्यादीनुसार,
मुलगी वनिता हिची सासु कुसुम ,व पती कांतीलाल यानी शाररिक व मानसिक त्रास देउन तिला क्रुर वागणुक देउन,उपाशी पोटी ठेउन छऴ केला त्यावेऴी ती मनाने खचल्याने तिने सासु व पतीचे त्रासाला कंटाऴुन विषारी औषध पिले आहे. माझी मुलगी वनिता कांतीलाल वाघमोडे वय 26 वर्ष रा.60फाटा माळशिरस हिचे सन डिसेबंर 2013रोजी लग्न झाले पासुन ते दि.10.03.2020 रोजी रात्री 08.00 वा.पर्यंत तिचे सासरी तिचा पती 1)कातींलाल लक्ष्मण वाघमोडे,व सासु 1)कुसुम लक्ष्मण वाघमोडे दोघे रा.60 फाटा माऴशिरस यानी मुलगी वनिता हिचा शाररिक व मानसिक त्रास देउन तिला क्रुर वागणुक देउन,उपाशी पोटी ठेउन छऴ केला त्यावेऴी ती मनाने खचल्याने तिने सासु व पतीचे त्रासाला कंटाऴुन विषारी औषध पिले व तिचेवर अकलुज येथिल अश्विनी हस्पीटल येथे उपचार सुरु असताना ती दि.10.03.2020 रोजी रात्री 08.00 वाजता मयत झाली आहे तिस तिची सासु व पती यानी आत्महत्या करणेस प्रवुत्त केले आहे म्हणुन माझी त्याचे विरुद्ध फिर्याद आहे.
सदर प्रकरणी माळशिरस पोलिसांत पती 1)कातींलाल लक्ष्मण वाघमोडे,व सासु 1)कुसुम लक्ष्मण वाघमोडे यांचे विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० चे ३०६, ३४, ४९८ अ नुसार गुन्हा दाखल करणेत आला आहे.
No comments