पुणे । त्या व्यक्तीच्या संपर्कात असणाऱ्यांची तपासणी होणार

पुण्‍यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्‍यानंतर त्‍यांच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींची तपासणी करण्‍यासाठी पथके स्‍थापन करण्‍यात आली आहेत, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्‍त डॉ.दीपक म्‍हैसेकर यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिली. कोरोना विषाणूंचा प्रसार इतर विषाणूंच्‍या तुलनेत अधिक होत असल्‍याने सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.


No comments