कर्जमाफी योजना । जिल्हाधिकारी यांनी दिली बोंडले विकास सोसायटीस भेट


जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे माळशिरस तालुक्याच्या दौर्‍यावरती आले होते. यावेळी त्यांनी बोंडले (ता.माळशिरस) येथील बोंडले विकास सेवा सोसायटी, जिल्हा मध्यवर्ती बँक व बोंडले ग्रामपंचायतीस भेट देऊन महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेबाबत लाभार्थ्यांशी संवाद साधला. तसेच जे शेतकरी कर्जमुक्त होतील त्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे व असे शेतकरी पुन्हा खरीप हंगामात नवीन पीक कर्ज घेण्यास पात्र होतील असेही ते म्हणाले.
यावेळी उपविभागीय अधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजित पाटील, नायब तहसीलदार तुषार देशमुख, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, सहाय्यक निबंधक देविदास मिसाळ, बोंडले सोसायटीचे चेअरमन संतोषकुमार देशमुख, व्हा.चेअरमन दत्तात्रय जाधव,  उपसरपंच विजयसिंह देशमुख, पंचायत समितिचे माजी सदस्य भागवत पाटील, धनाजी जाधव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक व्ही.एच.रामपुरे, बँक निरिक्षक व्ही.बी.बोधले, तलाठी पांडुरंग धनवडे, ग्रामसेवक बी.बी.कोरबू, सचिव उदयकुमार वाघमारे, जहांगीर मुलाणी, खळवे सोसायटीचे चेअरमन शहाजी पाटील, महा-ई-सेवा केंद्र चालक प्रदीप दणाणे, राहूल निकम, पांडुरंग देशमुख, दिपक जाधव, संजय सुरवसे, मारूती ननवरे, लिपिक विठ्ठल मोरे, योगेश तुपे यांच्यासह पात्र शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मा.जिल्हाधिकारी यांनी बोंडले विकास सेवा सोसायटी, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक येथे भेट देऊन आधार प्रमाणीकरणाच्या कामाचा आढावा घेतला जिल्हाधिकारी शंभरकर हे या दौर्‍याच्या निमित्ताने प्रथमच माळशिरस तालुक्यात आल्याबद्दल बोंडले विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संतोषकुमार देशमुख यांनी सोसायटी हॉल मध्ये तर बोंडले ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच विजयसिंह माने-देशमुख यांनी बोंडले ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोससायटीचे चेअरमन संतोषकुमार देशमुख यांनी केले.

कर्जमुक्ती योजनेतील पात्र सभासदांची संख्या व एकूण रक्कम:-
१) बोंडले विविध कार्यकारी सोसायटी- ६२ सभासदांचे ४५ लाख ६३ हजार ४८६ रुपये.
२) खळवे विविध कार्यकारी सोसायटी - १०९ सभासदांचे ६९ लाख २६ हजार ४९७ रुपये.
३) दसूर विविध कार्यकारी सोसायटी - ९६ सभासदांचे ६५ लाख ६६ हजार ९४४ रुपये.
४) सयाजीराजे विविध कार्यकारी सोसायटी - १३ सभासदांचे ६ लाख ७३ हजार १७३ रुपये.
५) विजयसिंह मोहिते-पाटील विविध कार्यकारी सोसायटी, तोंडले – १७ सभासदांचे १५ लाख १८ हजार ६८३ रुपये.

No comments