खंडाळीच्या डी.सी.सी.बॅंकेचे तत्पर सेवा,कर्जमाफ शेतकर्याचे केले रात्री दहा वाजेपर्यंत लाॅगींग

 खंडाळी (ता.माळशिरस) येथील ६२ शेतकर्याना सुमारे ४३ लाख रू कर्जमाफी झाली असून शेतकर्यानी रात्री दहा वाजेपर्यंत रांगेत थांबवून कर्जमाफीचे ऑनलाईन लाॅगींग करून घेतले.
 खंडाळीचे तलाठी शिवाजी  घाडगे व त्यांच्या टीमने काल ऑनलाईन लाईन लाॅगींगचे सेट अप डी.सी.सी.बॅकेत केले परंतु सर्व्हर फेल दाखवत असल्याने प्रत्येक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होण्यास सायंकाळचे पाच वाजले तो पर्यंत बॅंक बंदची वेळ झाली होती. परंतु बॅकेसमोर झालेली शेतकर्याची गर्दी पाहून बॅंकचे मॅनेजर के.एम.सावळे, लिपीक संजय पवार,शिपाई संतोष मोरे, कैलास मोरे  व शिवज्योत कॅम्प्यटरचे सतीश गोसावी यांनी शेतकर्याच्या भावना पाहून लाॅगींग सुरू ठेवले ही प्रक्रिया रात्री दहा वाजे पर्यंत बॅक चालू ठेवून आलेल्या सर्व शेतकर्याचे लाॅगींग करून घेत रात्री दहा वाजता शेतकरी बापूसाहेब भोसले यांना कर्जमाफीचे पत्र दिले.त्यामुळे बॅकेच्या सर्व स्टाफचे शेतकर्यानी आभार मानले.
 सहकार महर्षी, विश्वतेज, खंडाळी विकास सोसायटीच्या एकूण ६२  सभासदाचे ४३ लाख रू कर्जमाफ झाले असून गेल्या तीन चार वर्षापासून असलेली सोसायटीची मरगळ दुर होण्यास मदत होणार आहे. 


"दोन रूपयाने दोन लाख वाचवले"
शहाजी अगतराव गायकवाड यांच्या कर्ज खाते दोन रूपये कमी असल्याने १९९९९८रू कर्ज माफ झाले.


No comments