ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना दिलासा; उमेदवारी अर्जासाठी असलेल्या जातपडताळणी प्रमाणपत्राच्या अटीमध्ये सूट - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
जातवैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करु न शकणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. आता त्यांना जातपडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तरी निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. राज्य विधानसभेनंतर विधानपरिषदेने याबाबतचे ग्रामविकास सुधारणा विधेयक बुधवारी एकमताने मंजूर केले. त्यानंतर राज्यपालांनीही या सुधारणेस मान्यता दिली असून अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली.
No comments