फळबाग लागवड योजनेत नव्या पिकांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश


राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत द्राक्ष, केळी, पपई, शेवगा व स्ट्रॉबेरी या पिकांचा नव्याने समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे आणि रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे यांनी दिले.

मंत्रालयात फळबाग योजनेत नवीन पिकांचा समावेश करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.


No comments