आद्य जगद्गुरू रेणुकाचार्य अवतार दिन उत्सवास आजपासून प्रारंभ


श्री श्री श्री 1008 आद्य जगद्गुरू रेणुकाचार्य अवतार दिन उत्सवास दि.4 मार्च रोजी प्रारंभ होत असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री सदाशिव स्वामी गुरूमुक्तेश्वर वेळापूर स्वामी मठाचे श्री श्री 108 सद्गुरू मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली.
स्वामी म्हणाले, बुधवार दि.4 मार्च ते रविवार दि.8 मार्च 2020 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले आहे.
 यावेळी धर्मरत्न श्री श्री 108 डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, होटगी, श्री श्री 108 शिवलिंग शिवाचार्य महास्वामी, बेळंकी व श्री श्री 108 शिवशंकर शिवाचार्य महास्वामी, नेरपिंगळाई हे उपस्थित राहणार असून दि.8 मार्च रोजी शिवराज शर्मा यांचा उत्तराधिकार कार्यक्रम होणार आहे. श्री श्री 108 सद्गुरू मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा 44 वा पीठारोहन वर्धापन दिन, शिवदिक्षा अय्याचार संस्कार, व्याख्यान, प्रवचन, भारूड, श्री गुरूंची तुलाभार एवं वीरशैव लिंगायत जंगम व सर्व पोटजातींचा वधूवर मेळाव्याचे आयेाजन करण्यात आले आहे. दि.4 ते दि.8 दरम्यान सकाळी 6 वा. पंचाचार्य ध्वजारोहन, स.6.30 ते 8.30 श्री गुरूगादीस महारूद्राभिषेक बिल्वार्चन महामंगलारती, 9 ते 9.30 सामुदायिक जप, 9.30 ते 12.30 श्री ग्रंथराज परमरहस्य पारायण व निरूपण, 2 ते 5 सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, 5 ते 6 सामुदायिक शिवपाठ, 6 ते 7 व्याख्यान व रात्रौ.9 वा. चर्चासत्र, शंकासमाधान संवाद जागरचे आयोजन करण्यात आले आहे.
 या उत्सवामध्ये वे.मु.शिवशंकर स्वामी, वे.मु.कुमार स्वामी गणाचार्य, शि.म.प.डॉ.सुरेखा नागलमे, वे.मु.शिवराजस्वामी यांचे व्याख्यान तर शनिवार दि.7 रोजी 8 ते 10 या वेळेत सौ.लक्ष्मीबाई गिराम व गंगुबाई जाधव यांचे भारूड होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चंद्रकांत कुंभार, विठ्ठल बागल, श्रीकांत होडगे, सूर्यकांत मिरगे, प्रशांत पुराणिक उपस्थित होते.

No comments