mpsc result 2018 । सोलापूरचा वैभव नवले राज्यात प्रथम
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीव्दारे २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरिक्षक पदाच्या परीक्षेत सोलापूरचा वैभव अशोक नवले हा राज्यातून प्रथम आला आहे. अहमदनगरमधील ज्ञानदेव रघूनाथ काळे हा मागास प्रवर्गातून प्रथम आला आहे. तर महिला प्रवर्गातून सातारा जिल्ह्यातील दिपाली सुर्यकांत कोळेकर पहिली आली आहे.
एमपीएससीमार्फत पोलिस उपनिरिक्षक गट ब संवर्गातील एकूण ३८७ पदांसाठी २६ ऑगस्ट २०१८ रोजी पेपर क्र.१ आणि २ सप्टेंबर २०१८ रोजी पेपर क्र. २ घेण्यात आला. या परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी (दि.१७) रोजी जाहीर करण्यात आला आहे.
लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारिरीक चाचणी आणि मुलाखतीसाठी १ हजार ६५९ उमेदवार पात्र ठरले होते. या उमेदवारांच्या मुलाखती ६ नोव्हेंबर २०१९ ते २९ जानेवारी २०२० या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. त्यातून ३८७ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
No comments