आता महाराष्ट्रात लवकरच होणार पाऊसाचे आगमन - पहा सविस्तर

केरळमध्ये १ जून या अपेक्षित तारखेच्या दोन दिवस आधीच म्हणजे शनिवारी मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे पाऊस ५ अथवा ८ जून रोजी दाखल होणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पहा कशी राहणार पुढील हवामान स्थिती
३१ मे ते १ जून या काळात अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल हवामानातील या बदलामुळे मान्सून वेगाने पुढे सरकेल. दरम्यान १ आणि २ जून रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे ,अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
Post Comment
No comments