लॉक डाऊन ५ : ठाकरे सरकारकडून दिशानिर्देश जाहीर । पाहा सविस्तर

Lockdown 5: Thackeray government announces guidelines. See detailed
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. लॉकडाऊन 4.0 आज रात्री 12 वाजता संपणार असून उद्यापासून 1 जून पासून लॉकडाऊन 5.0 लागू होणार आहे. तो 30 जून पर्यंत लागू राहणार आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकारने शनिवारी दिशानिर्देश जाहीर केले होते. दरम्यान, ठाकरे सरकारनं लॉकडाऊन 5.0 बाबत आज (रविवार) दिशानिर्देश जाहीर केले आहेत. लॉकडाऊन 5.0 मध्ये 3 टप्पे करण्यात आले आहेत. 3 जून, 5 जून आणि 8 जून पासून लॉकडाऊन 5.0 उघडणार आहे. त्यासंदर्भातील नियमावली राज्य सरकारनं जाहीर केली आहे.

पहिला टप्पा : 3 जून पासून – यामध्ये पहाटे 5 ते सायंकाळी 7 दरम्यान वैयक्तिरित्या सायकलिंग, जॉगिंग, रनिंग करता येणार आहे. सार्वजनिक आणि खासगी क्रीडांगणावर या गोष्टी करता येणार आहेत.

दुसरा टप्पा : 5 जून पासून – मॉल आणि मार्केट कॉम्पलेक्स सोडून इतर बाजारपेठा उघडल्या जाणार असून त्या काही अटी व शर्तींवर सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान चालू राहणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारनं पी-1 आणि पी-2 चं नियोजन केलं आहे. दरम्यान, 5 जून पासून नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी आणि दुचाकींचा वापर करण्यासाठी काही अटी व शर्तींवर परवानगी देण्यात आली आहे. टॅक्सी, कॅबमध्ये चालक आणि 2 व्यक्ती, रिक्षामध्ये चालक आणि दोन व्यक्ती, चारचाकीमध्ये चालक आणि 2 व्यक्ती तर दुचाकीवर केवळ एकानेच प्रवास करावा असे सांगण्यात आले आहे

तिसरा टप्पा : 8 जून पासून – सर्व खासगी कार्यालये उघडण्यास परवानगी दिली आहे मात्र कर्मचार्यांची संख्या केवळ 10 टक्के ठेवावी असे देखील सांगण्यात आले आहे. त्यासाठी देखील काही अटी सरकारनं घातल्या आहेत. दरम्यान, या टप्प्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये दुचाकीवर एकजण प्रवास करू शकणार आहे तर तीन चाकी मध्ये चालक आणि इतर 2 व्यक्ती आणि चारचाकीमध्ये देखील चालक आणि इतर दोन व्यक्ती प्रवास करू शकणार आहेत.

No comments