वानखेडे, ब्रेबॉर्न स्टेडियमवर कोविड सेंटर नाहीच: आदित्य ठाकरे
वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर कोविड सेंटर उभारण्याची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेली मागणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी फेटाळून लावली आहे. पावसाळ्यात मैदानांवर चिखल साचण्याची शक्यता असल्याने कोणतंही मैदान कोविड सेंटरसाठी ताब्यात घेण्यात येणार नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
No comments