केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (मिलिटरी) कॅन्टीनवर मिळणार फक्त स्वदेशी वस्तू



केंद्रीय गृह मंत्रालयाने पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत घेतला निर्णय 
 मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना स्वावलंबी भारत अभियानाची हाक दिली. या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय गृहमंत्रालयाने आज देशातील सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (मिलिटरी) कॅन्टीनवर १ जून २०२० पासून फक्त स्वदेशी वस्तूंची विक्री करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरवर दिली आहे. 
अमित शहा यांनी म्हंटले की, काल पंतप्रधान मोदींनी जे स्वावलंबी भारत अभियान आणि लोकल प्रॉडक्टला व्होकल बनविण्याचे आवाहन हे निश्चितपणे येणाऱ्या काळात भारत देशाला जागतिक नेतृत्व करण्यासाठीचा मार्ग सक्षम होणार आहे. गृहमंत्रालयाच्या या निर्णयामुळे देशातील १० लाख केंद्रीय सशस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांच्या ५० लाख पारिवारिक सदस्य हे स्वदेशी उत्पादित वस्तूंचा वापर करणार आहेत. 


No comments