पुणे । सॅम्पल तपासणीची क्षमता वाढविण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना
डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांमध्ये सध्या मोठया प्रमाणात कोविड-19 चे सॅम्पल तपासणीसाठी येत आहेत. विशेष करुन पुणे महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांची संख्या वाढत असल्याने या भागातून सॅम्पल अधिक येत आहेत. या सॅम्पल तपासणीचा अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. प्रयोगशाळांसाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक असणाऱ्या मशिनरी तसेच इतर साहित्य गरजेनुसार प्रशासनाकडून पुरवले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रयोगशाळांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे सांगून जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, आवश्यक बाबींसाठीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे तात्काळ सादर करावेत, जेणेकरून त्याची पूर्तता करता येईल.
No comments