रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा LIVE होणार: छत्रपती संभाजीराजे यांची माहिती


 यंदाही रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडेल. त्यात खंड पडू देणार नाही, असं सांगतानाच शिवभक्तांना रायगडावर येण्याची गरज पडू नये म्हणून त्यांना हा सोहळा थेट लाइव्ह दाखवण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिली.
छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विट करून या परंपरेत कोणताही खंड पडू देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सर्व शिवभक्तांना मी एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरेमध्ये खंड पडू देणार नाही. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा माझा मानस आहे, असं छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

No comments