संत सोपानदेव मंदिरात संत मुक्ताई तेजोविलीन सोहळा व चंदनउटी संपन्न

आज संत मुक्ताई तेजोविलीन सोहळा संत सोपानमहाराज समाधी मंदीरात पार पडला..हा कार्यक्रम वर्षानुवर्षे संत सोपानदेव सेवेकरी मंडळ तसेच सासवड ग्रामस्थ दिंडी क्रमांक 15 रथामागे तसेच वारकरी सेवा संघ यांचा तर्फे साजरा केला जातो..या वर्षी कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला गेला..यावेळी ह.भ.प पवार महाराज आणि ह.भ.प मोहनदादा उरसळ यांची प्रवचन सेवा झाली..यावेळी देवस्थानचे गोसावी महाराज.. मनोज महाराज चोपदार..हरिभाऊ चोपदार..गोविंद जोशी..बंटीनाना जगताप..बाळासाहेब जगताप..सचिन जगताप..उपस्थित होते...सोपानदेव सेवेकरी मंडळ तर्फे देवाला उन्हाची दाहकता कमी व्हावी म्हणुन दुपारी चंदन उटी लेप करण्यात आला. 

No comments