आता क्वारंटाइनसाठी वापरणार वानखेडे स्डेडियम


महाराष्ट्रामध्ये करोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळाले आहे. भविष्यात ही संख्या जर वाढली तर रुग्णांना कुठे क्वारंटाइन करायचे, हा प्रश्न पडू शकतो. यासाठी मुंबई महानगरपालिकेने रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी वानखेडे स्टेडियमची मागणी केली आहे. मुंबई क्रिकेट संघटनेनेही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांना सर्वतोपरी मदत करायला ते सज्ज आहेत.


No comments