माळशिरस तालुका होमिओपॅथीक डॉक्टर्स संघटनेतर्फे महसूल विभागातील कर्मचार्‍यांना कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथिक औषधांचे मोफत वाटप



 आज शुक्रवार दि. १५ मे २०२० रोजी *मदत नव्हे कर्तव्य* या भावनेतून कोरोनाशी लढत असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील महसूल कर्मचार्यांसाठी माळशिरस तालुक्याच्या प्रांताधिकारी मा. श्रीमती शमा पवार, तहसीलदार मा. अभिजीत पाटील यांच्याकडे आयुष मंत्रालय भारत सरकार यांनी निर्देशित केलेले कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथिक औषधांचे १००० कर्मचार्‍यांना पुरेल एवढी औषधे मोफत देण्यात आली.

  यावेळी प्रांताधिकारी मा. श्रीमती शमा पवार यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी फिव्हर क्लिनिकच्या माध्यमातून होमिओपॅथिक डॉक्टरांनी चांगली सेवा दिलेली असून यापुढेही त्यांनी असेच सहकार्य करावे असे आवाहन केले.

यावेळी डॉ.बाळकृष्ण गायकवाड़ (सदस्य महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथि, मुंबई),डॉ.पृथ्वीराज माने पाटील (तालुकाध्यक्ष, होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना, माळशिरस), डॉ.मल्लिकार्जुन कुंभार,डॉ. अतुल गांधी,डॉ.सपना गांधी,डॉ. सुनील गांधी,डॉ. राजेश चंकेश्वरा,डॉ. अभिजीत राजे-भोसले,डॉ.रविंद्र शिंदे,डॉ.निनाद दोभाडा,डॉ. प्रमोद गायकवाड इ. संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


No comments