रेशनकार्ड नसल्याने धान्य दिले नाही म्हणून दुकानदाराला मारहाण
रेशनकार्ड नसल्याने रेशन न देणाऱ्या रेशन दुकानातील कामगाराला एकाने दगडाने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 11) सायंकाळी संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.
सचिन विठ्ठल शिवलकर (वय 36, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रवीण दिलीप कांबळे (वय 26, रा. अजंठानगर, चिंचवड. मूळ रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments