कोरोना लढाईत मनोरंजन क्षेत्र मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी
नियम पाळून चित्रीकरण, निर्मितीविषयक कामे सुरु करण्याबाबत अनुकूल; निश्चित कृती आरखडा द्या – मुख्यमंत्र्यांची निर्मात्यांना सुचना
कलाकार, तंत्रज्ञ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही
शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरु करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. महाराष्ट्रातील मनोरंजन उद्योगातील विशेषत: मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिका यांचे निर्माते, कलाकार यांच्याशी ते आज संवाद साधत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री सचिवालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ संजय मुखर्जी तसेच मान्यवर निर्माते, कलाकार सहभागी झाले होते.
No comments