विजयवाडी, विझोरी येथे राष्ट्रवादी धान्यबँक मार्फत किराणा वाटप
माळशिरस तालुक्यातील विजयवाडी व विझोरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या धान्य बँक मार्फत किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
विजयवाडी या गावी वैदू समाजाची लोकवस्ती आहे , फिरून व्यवसाय करणारे हे लोक हातावरची पोट असल्याने अडचणींचा सामना करत होते. तर विझोरी गावात नंदिवाले समाजाची व मागासवर्गीय समाजाची लोकवस्ती आहे, मोल-मजुरी , खेळणी विक्री व्यवसाय करणारे व पारंपरिक वाद्य हलगी संघ असणारे हे लोक लॉकडाउन असल्याने लग्न, सभा, जत्रा, यात्रा, आठवडी बाजार बंद झाल्याने अडचणींमध्ये आहेत.
यावेळी गटनेते गणेशरावआबा काळे पाटील , युवा नेते के. पी. काळे पाटील, पंचायत समितीचे सदस्य अजय सकट, विकास दादा धाइंजे, एनडीएमजेचे राज्य सचिव वैभव गीते, सरपंच मालोजीनाना काळे आदी उपस्थित होते.
No comments