जनसेवा संघटनेच्या रक्तदानाचा एक हजार टप्पा पूर्ण


    कोरोना व्हायरसचे पार्श्वभूमीवर जनसेवा संघटनेचे नेते डाॅ.धवलसिंह मोहीते पाटील यांनी स्वःता रक्तदान करून शिबीराची सुरवात केली होती   संघटनेचे 1000 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून  या उपक्रमात सहभाग नोंदवला.  या रक्तदान शिबीरात सौ.उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांनी  स्वतः  1001 वे रक्तदान करून समारोप केला. 
या कार्यक्रमासाठी  डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील,  प्रांताधिकारी शमा पवार, माळशिरस तालुक्याचे तहसीलदार अभिजीत पाटील,   उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु, अकलुज ,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.रामचंद्र मोहिते साहेब उपजिल्हा रूग्णालय अकलुज च्या अधिक्षक डाॅ.सुप्रीया खडतरे ब्लड बॅंकेचे डाॅ. बाहुबली दोशी डाॅ.संतोष खडतरे  यांचे सह जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव मिसाळ,उपाध्यक्ष अण्णासाहेब इनामदार, युवक अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, शंकरराव मोहिते पाटील बॅंकेचे चेअरमन सतिश नाना पालकर सरचिटणीस  दत्ता जाधव, अकलुज शहर अध्यक्ष  गणेश काका महाडीक, शाहीर राजेंद्र कांबळे, रणजीतसिंह देशमुख ,दादा जाधव, जोतीताई कुंभार,योगीता देशमुख  रूपाली गांधी, डाॅ.कदम, सचिन गायकवाड, सागर देशमुख  नंदा साठे, स्वराली पालकर ,सुषमा निकम, नंदा लोखंडे ,राजश्री कनाळ, कविता कनाळ, गीता बिराजदार, श्रुती नालवर, माधुरी वाघमारे, मीनल साठे जिल्हा सरचिटणीस सुधीर रास्ते,युवक जिल्हा सरचिटणीस मयुर माने,व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments