चालत आणि अवैध गाड्यांनी येणाऱ्यांना यूपीत प्रवेश बंदी


चालत येणाऱ्या मजुरांना जागरूक करावं आणि पोलिसांनी त्यांना थांबवावं. आदेशचे काटेकोरपणे पालन करावे, असं आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक उच्च स्तरीय बैठक घेतली आणि लॉकडाऊनच्या नियमांची समीक्षा केली. मजुरांनी आणि कामगारांनी चालत किंवा अवैध वाहनांनी आणि असुरक्षितपणे गावाकडे प्रवास करू नये. इतर राज्यांमध्ये अडकलेल्या सर्व मजूर आणि कामगारांना राज्य सरकार सन्मानने त्यांची घरवापसी करेल. यासाठी युद्धपातळीवर व्यवस्था सुरू आहे, असं आवाहन आदित्यनाथ यांनी केलंय.


No comments