गुडन्यूज । सोलापूर जिल्ह्याचा वार्षिक पतपुरवठा आराखडा जाहीर

Collector office solapur
सोलापूर जिल्ह्यासाठी  सन 2020-21 साठीच्या 9414.57 कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखडयास मंजुरी देण्यात आली, असल्याची माहिती जिल्हा अग्रणी प्रबंधक संतोष सोनवणे  यांनी दिली. 
श्री सोनवणे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या शेतक-यांचे उत्पन्न् 2022 पर्यंत दुप्पट करणे आणि सर्वांसाठी घरे उपल्ब्ध करुन देणे या धोरणानुसार हा पतपुरवठा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. आराखडयात शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य् देण्यात आले आहे.

सन 2020-21 आर्थिक वर्षासाठीचा संभाव्य् पतपुरवठा आराखडा नाबार्डच्या वतीने तयार करण्यात आला. हा आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला. या आराखडयातील नियोजनानुसार बॅकांनी पतपुरवठा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

पत पुरवठयातील नियोजन
पीक कर्ज- 4051.01, 
शेतीसाठी कर्ज- 2695.57, 
लघु-मध्यम उदयोग- 1916.28 ,  
शैक्षणिक कर्ज- 122.29, 
गृह कर्ज- 507.55, 
उर्जा उदयोग- 17.09,
 सामाजिक विकास - 86.33,
 निर्यात उदयोग- 18.45 कोटी रुपये.




No comments