सोलापूरात वाढली कांद्याची आवक
सोलापूर मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ने कांद्याचे लिलाव सुरू केले आहेत. आता या ठिकाणी कांद्याची आवक वाढत असल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर बाजार समिती मध्ये 30 हजार किंटल कांद्याची आवक झाली असून 1150 रुपयांपर्यंत कांद्याला भाव मिळत आहे. तर सर्वसाधारण दर 400 रुपयांपर्यंत आहे.
लॉक डाऊन मुळे शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध आहे नि त्यात निर्यातीला परवानगी दिली असून ही व्यापारी वर्गाकडून कमी प्रमाणात मागणी असल्याने दर सर्वसाधारण आहेत जशी ही मागणी वाढेल तसे दर ही वाढले जातील असे सोलापूर मधील व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

No comments