भारत व चीन ने आपापले सैन्य बोलावले माघारी
भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये लडाखजवळच्या गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यानंतर दोन्ही देशांनी गलवान खोऱ्यातून आपापले सैन्य माघारी बोलावले आहेत. भारतीय लष्कराने याबाबतची माहिती दिली आहे.
गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट 14 च्या जवळ दोन्ही सैन्यात बातचित सुरु होती. शांततेच्या मार्गाने चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरूवात केली. मग त्याचं रूपांतर संघर्षात झालं. चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर लाठ्याकाठ्या, दगड आणि टोकदार हत्यारांनी हल्ला चढवला. भारताने देखील चीनला जशास तसं उत्तर दिलं आहे.
Post Comment
No comments