गुडन्यूज । तालुक्यातील दोन बाधित रुग्ण झाले बरे



माळशिरस तालुक्यातील दोन कोरोना बाधित रुग्ण आज बरे होऊन आरोग्य विभागाकडून त्यांना आज घरी सोडण्यात आले.  संग्रामनगर, अकलूज येथे सापडलेले दोन रुग्ण उपचारासाठी केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.
आजपर्यंत तालुक्यात फक्त दोनच रुग्ण होते. त्यांच्या संपर्कातील सर्वच अहवाल निगेटिव्ह आले होते. 
आज तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, डॉ. अनिरुद्ध पिंपळे,डॉ. ओव्हाळ यांनी त्यांची पुन्हा प्राथमिक तपासणी केली व त्यानंतर त्यांना काळजी घेण्याचे नियम सांगून घरी सोडण्यात आले आहे. 
त्याचबरोबर त्यांच्यासोबत संपर्कात आलेले व दक्षता म्हणून त्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते त्यांचाही कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना होम क्वारंटाइन होण्याच्या सूचना देऊन त्यांनाही घरी सोडण्यात आले आहेत
माळशिरस तालुक्यातील प्रशासन व आरोग्य विभागाने अपार कष्ट घेऊन माळशिरस तालुक्यात सुरू होणारी कोरोना चैन रोखली असून त्यामुळे आज अखेर तालुक्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही.

No comments