माळशिरस । भाच्याने पळवली मामाची अल्पवयीन मुलगी, पोलिसांत गुन्हा दाखल
माळशिरस येथिल रहिवाशी असणाऱ्या तरुणाने आपल्या सख्या मामाची अल्पवयीन मुलगी लग्नाला नकार दिल्याने पळवून नेली. मामाने पोलिसांत तक्रार दिल्यावर भाचा व त्याचे साथीदारांना पोलिसांनी केले गजाआड.
माळशिरस येथील रहिवासी तानाजी मधुकर शेंबडे, अभिजित मधुकर शेंबडे दोघे बंधू यांचे मामा लव्हे, ता. माढा येथे राहतात. मामाच्या अल्पवयीन मुलीने लग्नाला नकार दिल्याने या दोघांनी आपले मित्रांच्या मदतीने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लग्न करण्याचा हेतूने राहत्या घरातून पळवून नेले. याबाबत मामाने कुर्डुवाडी पोलिसांत तक्रार दिल्याने हा सर्व प्रकार समोर आला असून पोलिसांनी याबाबत आरोपीना अटक केली आहे.
पोलिसांत तक्रार दाखल झालेवर लागलीच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. माळशिरस येथे येऊन पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांना बेंबळे येथिल नातेवाईकांची माहिती मिळाली तेथेही तपास केला मात्र आरोपीनी मुलीला उसात डांबून ठेवल्याने पोलिसांच्या हाती काही लागले नाही.
पोलिसांच्या भीतीने बेंबळे येथील नातेवाईकांनी तानाजी व अभिजीत यांना जाण्यास सांगितले असता पहाटे हे दोघे मुलीला घेऊन माळशिरस येथे आले. ही खबर पोलिसांना मिळाली व त्यांनी माळशिरस येथे तानाजी मधुकर शेंबडे, अभिजित मधुकर शेंबडे दोघे बंधू व त्यांचे साथीदार यांना अटक केली असून पिडीतीची सुटका केली आहे. कव्हे येथील विकास चोपडे हा गाडीचालक अद्याप फरार आहे.
No comments