सांगोला पोलिसांनी हस्तगत केल्या चोरीला गेलेल्या 16 मोटारसायकल

Sangola-police-seized-16-stolen-motorcycles
सांगोला पोलीस ठाणेस दि . १८/०६/२०२० रोजी सायं ०६.०० वा . मौजे सांगोला येथील पिसे हॉस्पिटल कडलास नाका सांगोला येथुन दि . २०/०५/२०२० रोजी दुपारी ०३.०० मोटार सायकल चोरीस गेल्याबाबत श्री संदिप प्रकाश मंडले वय २५ वर्ष , व्यवसाय - शेती , रा . राजापूर , ता.सांगोला , जि . सोलापुर यांनी फिर्याद दिली होती . त्यानंतर सांगोला पोलीसांनी गोपनीय बातमीदार मार्फत माहिती काढल्यानंतर मौजे चिकमहुद येथील राहुल गौतम काटे व त्याचे साथीदार हे सांगोला परिसरातील मोटार सायकलीची चोरी करत असल्याची माहिती मिळाली . सांगोला पोलीसांनी मौजे विकमहुद येथील १. राहुल गौतम काटे , वय २२ , २. नितीन विठठल गोडसे , वय ३० , ३. सुनिल उर्फ राजु महादेव नरळे , ३० , रा . चिकमहुद ता . सांगोला यांना अटक करून त्यांचेकडुन त्यानी सोलापुर , सांगली इ . परिसरातील चोरलेल्या आतापर्यंत १६ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असुन पोलीस तपासामध्ये त्यांचे आणखी साथीदार असल्याचे निष्पन्न झाले असुन आणखी मोटार सायकली जप्त होण्याची शक्यता आहे . सदर गुन्हयाचा तपास मा . पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील साहेब , अप्पर पोलीस अधिक्षक श्री अतुल झेंडे साहेब , मंगळवेढा उपविभागिय पोलीस अधिकारी श्री दत्तात्रय पाटील पाटील साहेब , पोलीस निरीक्षक श्री राजेश गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदिप पर्वते हे करीत असुन सदर कारवाईमध्ये पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख , वैजिनाथ कुंभार , धंनजय इरकर , संभाजी भोसले यांचा सहभाग होता . तरी सांगोला पोलीसांनी जप्त केलेल्या मोटार सायकलीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे . 



No comments