शिवराज्याभिषेक सोहळा । रायगड वर "हे" करतात मनमोहक फुलांची आरास
आज शिवराज्याभिषेक सोहळा
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक झाला होता. हा सोहळा दुर्ग दुर्गेश्वर रायगडावर खासदार युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
यावेळी सम्पूर्ण गडावर व सदरेवर जी मनमोहन फुलांची आरास केली जाते त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात......
गेली काही वर्षे शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी करण्यात येणाऱ्या फुलांच्या सजावटीची जबाबदारी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई देवस्थान ट्रस्टने स्विकारलेली आहे.
युवराज्ञी सौ.संयोगिताराजे सजावटीचे प्लॅंनिंग, डिझाईन श्री. सुभाष सरापले व श्री.अतुल चव्हाण यांच्याशी बोलून ठरवतात व त्याप्रमाणे ही जबाबदारी हे तंतोतंत पार पाडतात. सजावट ही नेहमी पारंपारिकच व त्यासाठी वापरण्यात येणारी सर्व फुले ही देशी वाणाचीच असली पाहिजेत असा सौ. संयोगिताराजेंचा आग्रह असतो.
"आम्हीच ते वेडे " या नावाने असणाऱ्या पेज चे ऍडमिन श्री.मालोजी जगदाळे हे शिवराज्याभिषेक समितीचे सदस्य असून त्यांच्यामार्फतच समितीचा संपर्क श्री.अतुल चव्हाण यांच्याशी आला व सजावटीचे काम सहज, सोपे व आकर्षक झाले. आणि म्हणूनच शिवराज्याभिषेक समितीने श्री.अतुल चव्हाण यांना राजसदरेवर असणाऱ्या शिवछत्रपतींच्या मूर्तीला शेला घालण्याचा मान दिलेला आहे.



No comments