सोलापूर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज साठी महत्वाची बातमी, जिल्हाधिकारी यांचे नवे आदेश

शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या
कार्यालयीन कामकाजासाठी परवानगी


कोरोना प्रतिबंधात्मक आदेश कायम ठेवून शासनाच्या दिनांक 14 जून 2020 रोजीच्या नवीन सुधारित पत्रानुसार शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या कार्यालयीन कामकाजासाठी परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
 जिल्हाधिकारी शंभरकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सार्वजनिक हिताच्या दृष्टीने 31 मे 2020 रोजीच्या आदेशान्वये लागू असलेले कोरोना प्रतिबंधात्मक आदेश कायम ठेवून शासनाच्या नवीन पत्रानुसार शैक्षणिक संस्था सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे. यामध्ये विद्यापीठे महाविद्यालये, शाळा यांचे कार्यालय सुरू होतील. केवळ कर्मचारी उपस्थित राहून काम करतील. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन, निकाल जाहीर करणे, ई सामग्रीचा विकास, त्याचबरोबर नॉन टीचिंगच्या उद्देशाने कामकाज करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

No comments