इच्छा असेल तर आत्ता सोलापूरात कोरोना रूग्णास घरीच उपचार
सोलापूरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच आज महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी पाॅझिटीव्ह रुग्णाच्या घरी सुविधा असतील तर त्याच्यावर त्याच्या घरीच उपचार करण्यात येतील व त्यावर महापालिकेचे आरोग्य पथक निरीक्षण ठेवील, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
श्री.शिवशंकर म्हणाले, अहवाल पॅाझिटीव्ह आलेल्या व्यक्तीची तपासणी होईल. घरी उपचार करणाऱ्या रुग्णाच्या घरी मात्र त्याच्यासाठी स्वतंत्र खोली असावी, स्वतंत्र स्वच्छतागृह असावे. या रुग्णांची ईच्छा असेल तर त्याला होम क्वारंटाईन करण्यात येईल व उपचार केले जातील.
Post Comment
No comments