धक्कादायक ! नवऱ्याला कामावरून काढण्याची धमकी देऊन जिल्हाधिकाऱ्याने केला महिलेवर बलात्कार

पतीला नोकरीवरून निलंबित करण्याची भीती दाखवून माजी जिल्हाधिकार्यानेच महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील जांजगीर चंपा जिल्ह्यात खळबळजनक प्रकार उघडकीस आला. महिलेने माजी जिल्ह्याधिकार्यावर अश्लील भाषेत मेसेज, व्हिडीओ पाठवून बोलल्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी पोलिसांनी तपास करून माजी जिल्हाधिकार्यांविरोधात तक्रर दाखल केली आहे.
जनक प्रसाद पाठक यांच्या विरोधात महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. एका सामाजिक संस्थेचे कामानिमित्ताने जिल्हाधिकार्यांना ही महिला कार्यालयात भेटायला गेली होती. त्यावेळी तिच्याकडून मोबाईलनंबर घेऊन काम झाल्यानंतर फोन करेन असे सांगितले होते. कामऐवजी या जिल्हाधिकार्यांनी तिच्यासोबत अश्लील मेसेज पाठवणे, व्हिडीओ पाठवण्यास सुरुवात केली. पीडित महिलेचे पती सरकारी कार्यालयात काम करतात. त्यांना प्रमोशन देण्याचे प्रलोभनासह काम करण्याची अट पूर्ण करण्यासाठी पीडित महिलेला त्याने भेटायला बोलाविले.पीडितेने नकार दिल्यास पतीला नोकरीवरून निलंबित करेन अशी धमकी देण्यात आली. कामानिमित्ताने महिला पुन्हा जिल्हाधिकार्यांना भेटण्यासाठी गेली असताना कार्यालयातच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. ही घटना 15 मे रोजी घडली असून या प्रकरणी पीडितेने पोलिसांनी फोनमधील सर्व मेसेज आणि व्हिडीओही दाखवल्याची माहिती मिळाली आहे.
Post Comment
No comments