बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दिले । डॉक्टर व सहाय्यक कामगार आयुक्त यांचेवर झाला गुन्हा दाखल
आपली तब्येत बरी नसल्याचे रजेसाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देणारे सोलापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त व ते प्रमाणपत्र देणारे डॉक्टर यांचेवर सोलापूरात गुन्हा दाखल करणेत आला आहे.
डॉ. उत्कर्ष वैद्य व सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे अशी त्याची नावे आहेत.
महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी निलेश येलगुंडे यांची नियुक्ती विडी घरकुल येथील सेंटर मध्ये केली होती मात्र आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगत त्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र देत आपण विश्रांती घेत असल्याचे कळवलं होते. मात्र वैद्यकीय प्रमाणपत्र देताना डॉक्टर कडून हॉस्पिटल च्या रजिस्टर ला कोणतीही नोंद आढळून आली नाही त्यामुळे हा सर्व भोंगळ कारभार समोर आला आहे.
Post Comment
No comments