त्या गोंडस तान्हुलीचे आई वडील सापडले !
कोथरूड परिसरात रस्त्याच्या कडेला गोंडस तान्हुलीला सोडून पसार झालेली तिची आई व घरी असलेले तिचे वडील पोलिसांना शोधण्यास यश आले असून ती तान्हुली आता तिचे घरी सुखरूप आहे.
काल पर्वा एका गोंडस तान्हुलीला रस्त्याच्या कडेला पाहून पोलिसांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते ते फोटो सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले होते.
पोलिसांनी या मुलीच्या आईला अटक केली असून घरगुती वादावरून तिने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. लक्ष्मी तुकाराम क्षीरसागर असे या आईचे नाव आहे.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्याने तिच्या घरच्यांचा शोध पोलिसांना लागला मात्र आई व ती दुपारी दवाखान्यात जातो म्हणून घरून गेलेले समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आईच्या मोबाईल नंबर चे लोकेशन ट्रेस करत तिला अटक केली असून गुन्ह दाखल केला आहे.
मात्र आपल्याला भूक लागल्याने आपण बाळ तिथेच ठेऊन खाण्यासाठी गेल्याचे तिच्या आईचे म्हणणे आहे.
Post Comment
No comments