१२ वर्षाच्या चिमुकलीचे लावलं लग्न, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल


12 वर्षीय चिमुकलीचा विवाह लावून दिल्याबद्दल सहा जणांविरुद्ध अकलूज पोलिसांत गुन्हा दाखल करणेत आला आहे. 

12-year-old-girl-gets-married-charges-filed-against-six


याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, 
निर्भया (बदललेले नांव) वय- 12 वर्षे ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना सुध्दा यातील आरोपी नामे 1) मालन जालिंदर चव्हाण वय 60 वर्षे 2) सचिन जालिंदर चव्हाण वय 32 वर्षे, 3) निर्भयाची आई सिता सतिश थोरात 4) वडील सतिश छगन थोरात दोघे रा. नवचारी संग्रामनगर ता.माळशिरस यांनी महिला 5) नामे कल्पना नामदेव गायकवाड रा.सदर हिचे मध्यस्थीने सर्वांनी मिळुन दिनांक 26/06/2020 रोजी सकाळी 7.00 वा. तिला मौजे संग्रामनगर ता.माळशिरस येथुन घेवुन तिचा विवाह आरोपी नामे 6) सुरज जालिंदर चव्हाण वय 29 वर्षे रा.मोडलिंब ता.माढा यांचे बरोबर लावुन दिला आहे म्हणुन वरील लोकांविरूध्द बालविवाह प्रतिबंधक अधिनियम चे कलम 9 व 10 प्रमाणे फिर्याद दाखल करणेत आली आहे. 

No comments