आज बारावीचा निकाल ! असा पहा आपला निकाल


12th result

बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत पार पडली होती. या परीक्षेचा निकाल दि.16 रोजी दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर लागणार आहे.

शाखानिहाय विद्यार्थीसंख्या :

▪️ यंदा एकूण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून, 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंद केली होती. तसेच 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही परीक्षा झाली होती.

▪️ यामध्ये शास्त्र शाखेचे 5,85,736 विद्यार्थी, कला शाखेचे 4,75,134 विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे 3,86,784 विद्यार्थी, व्यावसायीक अभ्यासक्रमाचे 57,373 विद्यार्थी असा समावेश आहे.

'या' वेबसाईटवर पहा निकाल :


दरम्यान, निकालानंतर विद्यार्थ्यांना गुण पडताळणी, उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे, पुनर्मूल्यांकन या गोष्टींसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.



No comments