नातेपुते । प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Cousins-Young-man-commits-suicide-due-to-his-girlfriend-troubles


नातेपुते येथील एका तरुणाने विवाहीत तरूणीच्या प्रेम प्रकरणातून तिच्या त्रासास  कंटाळून आत्महत्या केली असल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.सचिन मधुकर पाडळकर (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नांव आहे.याबाबत माळशिरस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी आहे की, सचिन पाडळकर हा या पूर्वी अहमदनगर येथे आपल्या कुटुंबा समवेत राहत होता. त्याचे वडिल एका खाजगी कंपनी मध्ये नोकरीस होते.त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सचिन हा त्यांच्या जागेवर नोकरीस लागला.नोकरी करीत असताना त्याची ओळख त्याच कंपनीत काम करणा-या  एका मुलीशी व त्याच्या भावाशी झाली ते सर्वजण मार्केटिंगचे  काम करीत होते. ओळख झालेली मुलगी सचिनला पैसे मागत होती. तू पैसे न दिल्यास बलात्काराची केस दाखल करीन अशी धमकी देत होती.त्याने तिला आडीच लाख रूपये दिले होते. तरी पण  तिचा नेहमी पैशाचा तगादा सचिनच्या मागे सुरु होता.त्यावेळी यापूर्वी  सचिनने झोपीच्या गोळया खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.सचिन याने मार्केटिंगचे  काम बंद केल्या नंतर तो आई व बहिणीसह गेल्या चार वर्षापासून नातेपुते येथे राहण्यास आला होता.नातेपुते या ठिकाणी सचिनने साडीचे दुकान सुरु केले होते.

     १२ जुलै रोजी सचिन हा जागरणाच्या कार्यक्रमाला जातो.असे सांगून घरातून गेला होता.त्यानंतर  तो परत घरी आलाच नाही. त्याच्या आईने सर्वत्र सचिनची सर्वत्र चौकशी केली.परंतु  त्याचा तपास कुठेच लागला नसल्याने १३ जुलै रोजी नातेपुते पोलिसात सचिन बाबत तक्रार दाखल केली.त्यानंतर त्यांच्या  शेजारी संतोष भरते यांनी चांदापुरी येथे कॅनल मध्ये एक पुरूष जातीचे प्रेत आढळले असल्याचे त्यांना सांगितले.त्यानंतर सचिनच्या कुटुंबातील व्यक्तीने माळशिरस येथे येऊन हे प्रेत पाहिले असता प्रेत सचिनचे असल्याचे दिसून आले. सचिन याच्या मृत देहा जवळ मोबाईल व काही चिटया सापडल्या त्यामध्ये मी प्रियसी व तिचा भाऊ यांच्या ञासास कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यामध्ये नमूद केल्याचे म्हटले आहे.माळशिरस पोलीस पुढील तपास करीत आहेत.


No comments