घरगुती वीज बिलात २ टक्के सवलत मिळणार

 
2-percent-discount-on-household-electricity-bill

 घरगुती वीज ग्राहकांना बिलात प्रचलित १ टक्क्यांऐवजी २ टक्के सवलत मिळेल, अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती, त्यानुसार आता यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे

हि सवलत कोणाला मिळणार ?

  या परिपत्रकानुसार ज्यांना एप्रिल, मे महिन्याचे वीजबिल सरासरी देण्यात आले आणि जून महिन्याचे बिल प्रत्यक्ष मीटर रीडिंगनुसार आले
अशा ग्राहकांनी त्यांचे संपूर्ण बिल मुदतीत भरले तर त्यांना जूनच्या वीजबिलाच्या रकमेच्या २ टक्के परतावा - जुलैच्या बिलातून मिळेल 
तसेच ज्या घरगुती ग्राहकांचे एप्रिल ,मे आणि जून या तीन महिन्याचे प्रत्येकी बिल सरासरी वापरानुसार दिले आहे 
 त्यांनी संपूर्ण बिल मुदतीत भरल्यास त्यांना - जुलैच्या चालू बिलाच्या रक्कम मध्ये २ टक्के सवलती दिली जाईल 

मग वीजबिल हप्त्यांमध्ये कसे भरायचे ?

ज्या ग्राहकांना जूनचे वीजबिल तीन हप्त्यांमध्ये भरायचे आहे, त्यांना ते जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर मध्ये चालू वीज बिला सोबत भरता येईल.

No comments