दुचाकी चालविण्यासाठी नवे नियम जाहीर
बाईक चालविणाऱ्यांसाठी नवे नियम जाहीर; 5 महत्वाचे नियम घ्या जाणून
बाईकवर मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही बाजूला हँड होल्डर असणे गरजेच, दोन्ही बाजून फुटरेस्ट असणेही सक्तीचं करण्यात आलं.
ज्या गाड्या या बॅटरीवर चालणाऱ्या आहे. त्या गाड्यांची वेगळी ओळख असावी यासाठी त्यांच्या नंबर प्लेट या हिरव्या रंगात असणार आहे आणि त्यावर पिवळ्या रंगाची अक्षर असावी.
बाईकच्या मागच्या चाकाचा अर्धा भाग हा कव्हर केलेला असावा; त्यामुळे मागे बसणाऱ्याचे कपडे त्यात जाणार नाहीत; अनेक अपघात याच गोष्टींमुळे होतात.
बाईकवर आता मागे कंटेनर ची सुविधा सुद्धा मिळणार पण त्याची लांबी 550 MM तर रुंदी 510 MM आणि उंची 500 MM पेक्षा जास्त नसावी आणि अशा प्रकारचं कंटेनर असेल तर मागे बसण्याला परवानगी नाही.
3.5 टन वजनाच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम बसविण्याची सूचनाही सरकारने दिली आहे. सर्व बाईक निर्मात्या कंपन्यांना या नियमांचं पालन नव्या गाड्या तयार करतांना करावं लागणार आहे.
Post Comment
No comments