जम्मू काश्मीर मध्ये दोन दहशतवादयांचा खात्मा
जम्मू-काश्मीर मधून एक मोठी बातमी आली आहे भारतीय सैन्यांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची ही मोठी बातमी आहे.
त्याचबरोबर या परिसरात आणखी दहशतवादी लपून बसण्याची शक्यता असल्याने भारतीय सैन्यांनी या परिसराचा कसून शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे.
जम्मू-काश्मीरचे विशेष पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी याबाबत माहिती दिली असून ते म्हणाले गुप्तहेरांनी कडून दहशतवाद्यांचा एक गट लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती त्या माहितीच्या आधारे लष्कराने ही कारवाई केली जम्मू काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगर मध्ये असलेल्या रणबीर गड या परिसरामध्ये लष्कराने शोध मोहीम सुरू केली होती या शोध मोहिमेत दरम्यान दहशतवाद्यांनी दशकावर गोळीबार सुरु केला यावेळी प्रत्युत्तर म्हणून सैन्यानेही दहशतवाद्यांवर गोळीबार केला यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे.
भारतीय सैन्याने दिलेल्या माहितीनुसार आणखी दोन ते तीन गट या परिसरामध्ये लपून बसले आहे या चकमकीनंतर सैन्याने पुन्हा एकदा तीव्र स्वरूपात त्यांची शोध मोहीम सुरू केली आहे 29 रायफल बटालियन चे जवान या ठिकाणी कारवाई करत आहेत.
Post Comment
No comments