माळशिरस तालुक्यात एकाच रात्री तीन गावांत मोठ्या चोऱ्या
माळशिरस तालुक्यात काल रात्री वेळापूर, तोंडले, श्रीपुर अश्या तीन गावांत मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. काही ठिकाणी चोरांचे प्रयत्न फसले असले तरी काही ठिकाणी चोरट्यानी मोठा डल्ला मारला आहे.
वेळापूर, ता. माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामपंचायत वेळापूर समोरील दोन कापड दुकाने चोरट्यानी फोडली आहेत. यामध्ये एका दुकानात भिशी चे असलेले सत्तर हजार रुपये लंपास केल्याची चर्चा असून दुसऱ्या दुकानातील कामगारांच्या पगारासाठी ठेवलेले तीस हजार रुपये ही चोरट्यानी नेले आहेत अशी चर्चा वेळापूर मध्ये रंगली आहे.
तर याच पोलीस स्टेशन हद्दीतील तोंडले येथे असणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फोडण्याचा प्रयत्न ही चोरांकडून झाला आहे. तर याच गावातील मेडिकल फोडून त्यातून वीस हजार रुपये लंपास केले असल्याची चर्चा तोंडले गावात ऐकायला मिळत आहे.
श्रीपुर परिसरात दोन सोन्याची दुकाने व एक सेतू चोरट्यानी फोडले आहे. तर एक दुचाकी ही चोरीला गेली आहे.
दरम्यान वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फोडण्याचा ही दुसरी वेळ आहे यापूर्वी तांदूळवाडी येथील बँक फोडण्याचा प्रयत्न झाला होता.
पोलिसांनी पंचनामे केले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अचूक माहिती ही गुन्हा दाखल झालेनंतर समोर येणार आहे.
Post Comment
No comments