ग्रामीण भागातील महिलांसाठी सरकारकडून ४२ कोटी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांसाठी सरकारकडून ४२ कोटी
तळागाळातील कुटुंबाना स्वयंरोजगार मिळावा व दारिद्रय कमी होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून सरकार एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे.
केंद्र आणि राज्याचा मिळून महिलांच्या सक्षमीकरणासाठी या योजनेत सरकारने ३१५ काटी ६० लाखाची तरतुद केली आहे.
काय आहे उद्दिष्ट या अभियान चे
ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार निर्माण करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
गरीबांना एकत्र आणून, त्यांच्या सक्षम संस्था उभारणे. गरीब वंचित महिलांचा समावेश स्वंयसहाय्यता गटामध्ये करणे.
सदर संस्थामार्फत गरीबांना एकत्रित करून, त्यांच्या संस्थाची क्षमता वृद्धी व कौशल्य वृध्दी करणे, वित्तीय सेवा पुरवणे आणि शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करुन देऊन त्यांना दारिद्रयाच्या बाहेर येण्यासाठी मदत करणे.
या योजनेअंतर्गत १० जिल्ह्यांमधील ३६ तालुक्यांकरिता ही योजना (NRLP (Intensive) म्हणून राबविण्यात येत आहे.
◆ ठाणे तलासरी, जव्हार, शहापूर, पालघर, भिवंडी
◆ रत्नागिरी रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा
◆ सोलापूर मोहोळ, सांगोला, माळशिरस, बार्शी
◆ नंदुरबार अक्कलकुवा, शहादा, धडगाव
◆ उस्मानाबाद उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा
◆ जालना जालना, भोकरदन, घनसावंगी
◆ यवतमाळ कळंब,घाटंजी, बाभुळगाव, राळेगाव, पांढरकवडा
◆ वर्धा देवळी, वर्धा, सेलू
◆ गोंदिया सालकेसा, अर्जुनी-मोरगाव, तिरोडा
◆ गडचिरोली कुरखेडा, धानोरा, एटापल्ली, अहेरी
Post Comment
No comments