महाराष्ट्र हादरला ! भूकंपाचे धक्के जाणवल्याने झोपलेले नागरिक घरातून बाहेर



महाराष्ट्र भूकंपाने हादरला असून मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवल्याने झोपलेले नागरिक घरातून बाहेर पळत सुटले तर अनेकांनी रात्र जागून काढली पालघरमध्ये मध्यरात्री भूकंपाचे दोन जोरदार धक्के जाणवले.



पालघर मध्ये रात्री एक वाजून 19 मिनिटांनी तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले सुमारे 2.8 रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता होती. या भूकंपाच्या धक्क्यामुळे जमीन हादरली त्यामुळे गाढ झोपलेले नागरिक भीतीने उठले व घरातून बाहेर पळत सुटले तर अनेकांनी रात्र जागून काढली आहे.
मध्यरात्री अचानक भूकंपाचे धक्के जाणवले यावेळी घराच्या भिंती हजर होत्या तर अनेक ठिकाणी भांडी पडल्याच्या घटना घडल्या आहेत गेल्या आठवड्याभरात जाणवलेली ही दुसरी घटना आहे यामुळे या परिसरातील नागरिक चांगलेच घाबरले आहेत. दरम्यान मध्यरात्री झालेल्या या भूकंपामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.




No comments