पोलीस असल्याचे सांगून पंधरा लाखाला फसवलं


लॉकडाऊन  काळात तुम्ही गोदाम सुरु का ठेवले असे म्हणत आम्ही गुन्हे शाखेचे पोलिस आहोत अशी बतावणी करत 4 इसमांनी एक लाख रुपये जबरदस्ती घेऊन गेले अशी फिर्याद कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आली त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या चौघांनी फक्त एक लाख रुपये नाही तर तब्बल पंधरा लाख रुपयाचा मोठा खंडणीचा प्रकार केला असल्याचे पोलिसांच्या अधिक तपासात उघड झाले आहे याबाबत प्रकाश भाटी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चौघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पुणे पाषाण येथील रहिवाशी विनोद उर्फ बाळ्या लक्ष्मण गोंडाबे याला अटक केली असून बाकी तिघांचा तपास पोलिस करत आहेत. 

No comments