मेंढपाळवर हल्ला झाला तर अनुसूचित जमाती अँक्ट नुसार कारवाई होणार : जानकर
याबाबत लवकरच मंत्रालय बैठक लावणार
महाराष्ट्र राज्यात विशेषतः लॉक डाऊन काळात मेंढपाळ बांधवांवर मोठया प्रमाणात हल्ला होत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. मात्र इथून पुढे जर मेंढपाळ बांधवांवर हल्ला झाला तर अनुसूचित जमाती ऍक्ट नुसार हल्लेखोरांवर कारवाई व्हावी यासाठी आपण लवकरच मंत्रालयात बैठक लावणार असल्याचे धनगर समाजाचे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांनी सांगितले आहे.
मेंढपाळ बांधव हा आपल्या मेंढ्यांचे पालन पोषण करण्यासाठी आपले घर, गाव सोडून रानामाळात हिंडत असतो स्वतःच्या जीवाची व कुटुंबाच्या पालन पोषणाची पर्वा न करता तो गुजराण करण्यासाठी मेंढ्या पाळत इकडे तिकडे भटकत राहतो मात्र काही शुल्लक कारणांवरून धन दाडग्यांकडून त्यांचेवर वारंवार हल्ले केले जात आहेत. अनेक ठिकाणी अतिशय गंभीर पणे मेंढपाळ बांधवांना व त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांनाही मारहाण होत आहे. त्यानंतर संबंधित हल्लेखोर लोकांविरुद्ध कोणतीही कडक कारवाई केली जात नाही. व त्यामुळे मेंढपाळ बांधवाना आणखी त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत आपण स्वतः लवकरच मंत्रालयात बैठक लावणार असून जर मेंढपाळ बांधव व त्याच्या कुटुंबावर हल्ला झाला तर हल्लेखोरांविरुद्ध अनुसूचित जमातीच्या ऍक्ट नुसार कारवाई व्हावी, आरोपींना लवकर जामीन मिळू नये व मेंढपाळ बांधवाना संरक्षण मिळावे यासारखे प्रश्न या बैठकीत मार्गी लावणार असल्याचेही जानकर यांनी सांगितले आहे.
No comments