अन्यथा वर्षा समोर तीव्र आंदोलन !

मराठा आंदोलनातील 42 आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ मार्गी लावावे नाहीतर वर्षा समोर आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चा ने दिला आहे.



मराठा ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चा चा वतीने २०१८ मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये ४२ बांधवांचे प्राण गेले. म्हणून त्या ४२ मराठा बांधवानच्या कुटुंबाना १०लाख रुपये आणि एक शासकीय नोकरी राज्य सरकारने द्यावे अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला

हे ठाकरे सरकार समाजाची फसवणूक करत आहे, ते काही करत नाही, केवळ खोटे आश्वासन देऊन समाजाची  दिशाभूल करत आहे. 

येत्या नऊ ऑगस्टला महाराष्ट्रात तील  ठाकरे सरकारमधील  मंत्र्यांच्या घरासमोर सर्व मराठा बांधव ठिया आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला.
9 ऑगस्ट पर्यंत कुठलंही चर्चा न करता मराठा समाजाला न्याय देण्याचे काम सरकारने करावे आणि 13700 हजार लोकांवर असलेले गुन्हे त्यांनी तात्काळ मागे घ्यावे अन्यथा महाविकास आघाडीला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या वतीने करण्यात आले.


No comments