उद्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन
उद्या सकाळी नऊ पासून सायंकाळी पाचपर्यंत आंदोलन -महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटन
कांद्याच्या उत्पादनासाठी किलोला ११ ते १२ रुपये असा खर्च येत आहे. ३० ते ४० टक्के कांदा चाळींमध्ये सडण्यास सुरवात झाली आहे. कांद्याला मात्र सरासरी पाच ते सहा रुपये किलो, भाव मिळत आहे. मात्र ग्राहक ला किलोला २५ ते ३० रुपये द्यावे लागतात आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही.
खासदार, आमदारांना शेतकरी फोन करतील, मंत्री आणि नेत्यांचे संपर्क क्रमांक संघटनेच्या फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. - संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे
काय आहे मागणी?
कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळतोय. त्यावर उपाय म्हणून केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांचा कांदा थेट २० रुपये किलो दराने खरेदी करून तो देशामध्ये वितरित करावा.
Post Comment
No comments