खेळताना ऐकलं नाही म्हणून आईनेच केला चार वर्षाच्या मुलीचा खून


घरामध्ये खेळत असताना चार वर्षाच्या मुलीने ऐकलं नाही म्हणुन स्वतःच्याच मुलीचा गळा आवळून आईने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिया दीपक काकडे व चार वर्षे असं या मुलीचं नाव असून सविता दीपक काकडे असं आईचं नाव आहे.



याबाबत पिंपरी चिंचवड मधील सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासूच्या निधनानंतर दहाव्याच्या विधीला घरातील सर्व जण बाहेरगावी गेले होते यावेळी घरामध्ये सहा महिन्यांचा मुलगा व चार वर्षांची मुलगी सविता काकडे यांच्यासह होती. 
दरम्यान सकाळी ही चिमुकली खेळताना त्रास देत होती व सांगितलेलं ऐकत नव्हती म्हणून आईने या मुलीचं डोकं भिंतीवर आढळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे तसेच पोलिसांना चिमुकलीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे पुरावे सापडले आहेत. 
यामध्ये आरोपी कविता यांचे मानसिक संतुलन स्थिर नसल्याबाबत ही माहिती समोर येत आहे दरम्यान सांगवी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

No comments