पाच हजार लाचेची मागणी करणारा पोलीस कर्मचारी लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात



दि .२३ / ०७ / २०२० श्री.सयाजीराव लक्ष्मण होवाळ , वय ५२ वर्षे , पद- पोलीस नाईक , मोहोळ पोलीस ठाणे , सोलापुर ग्रामिण रा सोलापूर यांनी ५००० / -रुपये लाचेची मागणी केली म्हणुन गुन्हा दाखल 

तक्रारदार यांनी दिनांक १६/०३/२०२० रोजी तक्रारदार व त्यांचा भाऊ , पत्नी , दोन मुले यांचेविरुध्द मोहोळ पो ठाणे गुरनं १४२/२०२० कलम ३२४,१४३ वगैरे भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल असुन सदरचा गुन्हा लोकसेवक होवाळ पोना / १०८७ यांचेकडे तपासावर आहे . दाखल गुन्हयात तक्रारदार यांचे पत्नी व दोन मुलास अटक न करण्यासाठी त्यांना नोटीस देवून सोडून देण्यासाठी तसेच सदर गुन्हयात मदत व पुढे सहकार्य करण्यासाठी लोकसेवक श्री.सयाजीराव लक्ष्मण होवाळ पोना / १०८७ यांनी तक्रारदार गवळी यांचेकडे ६००० / - रूपये लाचेची मागणी केली वगैरे मजकुरची तक्रार दि १६.३.२०२० रोजी ला.प्र.वि.कार्यालय सोलापूर येथे नोंदविली . त्यावरुन अॅन्टी करप्शन ब्युरो , सोलापूर कडुन तक्रारदार यांचे तक्रारीची खात्री करण्यात आली . त्यात लोकसेवक श्री.सयाजीराव होवाळ पोना / १०८७ यांचेकडे सदर गुन्हा तपासावर असल्याचे व सदर गुन्हयात तक्रारदार यांचे पत्नीस व दोन मुलास अटक न करता त्यांना नोटीस देवून सोडून देण्यासाठी तसेच सदर गुन्हयात मदत करण्यासाठी तक्रारदार यांना लोकसेवक श्री.सयाजीराव होवाळ पोना / १०८७ यांनी दिनांक १६/०३/२०२० रोजी व ०२/०७/२०२० रोजी तडजोडीअंती ५००० / -रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले . म्हणुन श्री.सयाजीराव लक्ष्मण होवाळ , वय ५२ वर्षे , पद- पोलीस नाईक , मोहोळ पोलीस ठाणे , सोलापुर ग्रामिण रा सोलापूर यांचेविरुध्द मोहोळ पोलीस ठाणे , सोलापूर ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे . 
सदरची कारवाई मा.श्री.राजेश बनसोडे , पोलीस उप आयुक्त / एसीबी पुणे व श्री संजय पाटील , अपर पोलीस अधिक्षक , यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस आयुक्त / पोलीस उप अधीक्षक संजीव पाटील , पोलीस निरीक्षक श्रीमती " कविता मुसळे , पोलीस निरीक्षक सफौ.सोलनकर , मपोना.स्वामी , पो.ना.पकाले , पो.कॉ.पवार , पो.कॉ.सन्नके पथक अॅन्टी करप्शन ब्युरो , सोलापूर यांनी केली आहे . याव्दारे जनतेस आवाहन करण्यात येते की , जर कोणी शासकीय / निमशासकीय लोकसेवक त्याचे पदीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , सोलापूर कार्यालयाशी प्रत्यक्ष अगर टोल फ्री क्रमांक १०६४ , फोन नं . ०२१७/२३१२६६८ , वर संपर्क साधावा ईमेल आईडी dyspacbsolapur@gmail.com वर तक्रार नोंदवावी . shule pu ( संजीव पाटील सहा.पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक , अॅन्टी करप्शन ब्युरो , सोलापूर

No comments